Yes.. चौकशी व्हायला हवी.

 अहमदाबाद येथील विमान अपघात ही अलीकडच्या काळातील भारतातील सर्वात दुःखदायी घटनांपैकी घटना आहे .सदर विमान केवळ अकरा वर्षे जुने होते .हवाई वाहतूक क्षेत्राच्या संदर्भात सदर विमान नवीन या सदरामध्येच मोडत होते .या जातीचे विमान क्वचितच अपघातग्रस्त होते इतकी त्याची बांधणी उत्तम , असून तांत्रिकदृष्ट्या  ही विमान श्रेष्ठ मानले जाते. सदर अपघातग्रस्त विमानाचे वैमानिक यांना किमान 9000 तास विमान उड्डाणाचा दीर्घ अनुभव होता. 

त्या सर्व बाबी पाहिल्यानंतर या अपघाताविषयी अनेक प्रश्न राष्ट्रीय तथा जागतिक स्तरावर देखील उपस्थित करण्यात येत आहेत .विमानाचे दोन इंजिन एकाच वेळेस बंद कसे पडू शकतात ..?हा एक प्रश्न आहे.. असा कोणता तांत्रिक बिघाड एकाएकी दोन्ही इंजिनामध्ये निर्माण झाला .?हा  शंकायुक्त प्रश्न सध्या विचारला जात आहे. आणखी एक विशेष विस्मय जनक बाब म्हणजे विमानातील सर्वच प्रवासी आणि वैमानिकासह अन्य कर्मचारी यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला .बहुतेकांच्या शरीराचां कोळसा झाला. मात्र एक सुदैवी प्रवासी  आश्चर्यकारकरित्या वाचला आहे.. त्या जीवाचे खरोखर अभिनंदन केले पाहिजे .कोणत्या अज्ञात शक्तीने त्याला वाचवले ,त्या शक्तीचे ही विशेष अभिनंदन करावे लागेल. सर्व प्रवाशांचा शरीराचा दुर्दैवी रित्या,अल्मोस्ट कोळसा झालेला असताना ,एक जीव वाचतो ही अत्यंत विस्मय जनक गोष्ट आहे.

  मात्र या विमान अपघाताने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत ..म्हणून आणि शेकडो निष्पाप जीव यात विनाकारण बळी गेले असल्या, मुळे या अपघाताची निष्पक्ष चौकशी होणे  आवश्यक आहे. सदर विमान अपघातामध्ये काही विदेशी नागरिकांचाही बळी गेला आहे .आपल्या देशात जरी नाही, तरी इंग्लंड अमेरिका किंवा युरोपातील अनेक देशांमध्ये त्यांच्या प्रत्येक नागरिकांच्या जीवाला सरकार अतिशय महत्त्व देते .आपल्या देशात कीडा मुंगी सारखे लोक मरतात आणि सरकार ढीम असते. सरकारला काही फरक पडत नाही. ही परिस्थिती पाश्चात्य देशांमध्ये किंवा सुधारलेले देशांमध्ये नाही.त्यांचा प्रत्येक नागरिक त्यांना महत्त्वाचा वाटतो . त्याचा जीव त्यांना महत्त्वाचा वाटतो या अनुषंगाने सदर विमान अपघातामध्ये इंग्लंडचे काही नागरिक मृत्यू पावले आहेत , इंग्लंड सारख्या देशाने सदर विमान अपघाताची निष्पक्ष चौकशीची केवळ मागणी करून थांबू नये तर स्वतःही या चौकशीसाठी सहकार्य करावे अशी सूचना मी करेल.

Comments

Popular posts from this blog

भूतकाळाचा कानोसा

वटवृक्ष

भ्रष्ट अधिकाऱ्यांना जरब