भूतकाळाचा कानोसा
नासिक मधील एका तत्कालीन प्रथितयश दैनिकांमध्ये (आता या दैनिकाला कोण विचारत पण नाही..) कार्यकारी संपादक या पदावर कार्यरत असताना
" मुशाफिरी " हा कॉलम मी लिहित होतो .शेकडो समाजोपयोगी प्रश्नांना या स्तंभाद्वारे मी वाचा फोडली.. त्यामुळे मुशाफिरी हा स्तंभ प्रचंड गाजला. या स्तंभामार्फत विविध विषय हाताळले..लेखामुळे काही कामे मार्गी लागली.काही छोटे पूल, नदी वरील फरशा , लहान तलाव रस्ते आदी निर्माण झाले .जनतेची सोय झाली. विषयांना रोखठोकपणे हाताळण्याची माझी शैली वैविध्यपूर्ण होती.. अनेक पत्रकारांनी माझ्या या लेखनशैलीचे अनुकरण केले.. याच "मुशाफिरी "सदरातील एक हा लेख इथे प्रसिद्ध केला आहे .
दिनांक 17 एप्रिल 1993 रोजी हा लेख मी प्रसिद्ध केला होता .
सरकारी अधिकाऱ्यांची कामाची पद्धत सर्वसामान्य जनतेला चांगलीच माहित आहे. छोटी छोटी कामे कशा पद्धतीने अडवली जातात. आणि किती त्रास जनसामान्यांना होतो हा चिंताजनक विषय आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकाऱ्यांची बैठक हा सदर मुशाफिरी लेखाचा विषय होता तत्कालीन विभागीय महसुल आयुक्त गिरीश गोखले यांनी चार जिल्ह्यांचे (त्यावेळी नाशिक, जळगाव ,धुळे ,अहमदनगर हे चार जिल्हे नाशिक विभागात अंतर्भूत होते..) . जिल्हाधिकारी , उपजिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार आदी अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक नाशिक जिल्ह्यातील वैतरणा धरण स्थित आलिशान Rest house येथे आयोजित केली होती. सदर बैठकीचा मूळ विषय वेगळा होता .आणि जनतेसमोर मांडण्याचा विषय वेगळा होता. मला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर बैठकी मध्ये टेबलाखालचे जे वाटप आहे ,याविषयी काही सूचना चार जिल्ह्यांचे कलेक्टर्स , डेप्युटी कलेक्टर आणि अन्य महत्वपूर्ण अधिकारी यांना देण्यात येणार होत्या .. विविध खात्याचे पैशाचे, कमिशन रेट, Amount आदी निश्चित करण्यात. येणार होते.थोडक्यात ही बैठक पूर्णतः भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये होती कोणी किती कलेक्शन करायचे,? कुठे करायचे ..?कोणत्या खात्याने किती पैसे जमा करायचे ?कुणाला किती पर्सेंट वाटा द्यायचा? आणि विभागीय महसूल कार्यालयाकडे किती वाटा पाठवायचा ?अशी गुप्त चर्चा या बैठकीत होणार होती .अशी माहिती मला मिळाली होती. हा विषय अतिशय गंभीर वाटल्यामुळे मी हा प्रश्न उचलायचा असे ठरवले .मात्र माझी आक्रमक लिखाणाची पद्धत होती , ती मी येथे वापरली नाही. डायरेक्ट अटॅक ,.. हल्ला ..करणे... समोर कोणीही असो, विषयाची बिनधास्त, बेडर पणे चिरफाड करणे . Analysis करणे..हा माझा लेखन स्थायीभाव आहे..तो मी.येथे वापरला नाही. आणि खोचक पद्धतीने, चिमटे घेत सदर लिखाण मी केले .ह्या माझ्या मुशाफिरी लेखाचा अपेक्षित तोच परिणाम झाला...विभागीय महसूल आयुक्तांनी सदर बैठक रद्द केली .नाशिकमध्ये जमलेले अनेक अधिकारी आपापल्या ठिकाणी परत गेले.. एका लेखामुळे ती बैठक बारगळली हे मी अभिमानाने नमूद करतो

Comments
Post a Comment