भ्रष्ट अधिकाऱ्यांना जरब
भ्रष्टाचाराविरुद्ध उग्र मोहीम सुरू करावी
मस्तवाल मनपा अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन या सर्व शासकीय यंत्रणामधील माजोरी अधिकाऱ्यांनाचांगलीच जरब मिळाली आहे..
राज्याचे आक्रमक नेते आणि अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी या माजेल शासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे .
नुकतीच द्वारका सर्कल येथे नामदार छगन भुजबळ यांनी भेट दिली .सर्कल हटवून तेथे पथदीप यंत्रणा उभारण्याचे काम चालू आहे त्या कामाची पाहणी करण्यासाठी भुजबळ येथे गेले असता या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच उलट तपासणी केली. संबंधित विभागाचे काही प्रमुख अधिकारी नामदार छगन भुजबळ यांच्या पाहणी दौऱ्यासाठी त्यांच्याबरोबर आलेले नव्हते. ही बाब आमदार भुजबळ यांना प्रकर्षाने खटकली. मनपा अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी, किंवा पोलीस अधिकारी यांना हॉटेलिंग करण्यामध्ये किंवा तारांकित हॉटेलमध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ आहे मात्र या कामांकडे लक्ष देण्यास वेळ नाही अशी अधिकाऱ्यांची कानउघाडणी ना. भुजबळ यांनी केली.
शासकीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार हा एक गंभीर रोग या देशाला लागलेला आहे आणि या रोगाचं समूळ उच्चाटन करणे फार आवश्यक झालेले आहे . सरकारकडून पगार स्वरूपात प्रचंड रक्कम मिळत असतानाही विविध सरकारी योजनांतून, गोरगरीब जनता,किंवा जनकल्याणावर खर्च होणारा किंवा सामाजिक उपक्रमावर खर्च होणारा प्रचंड निधीचा अपहार करायचा, प्रचंड भ्रष्टाचार करायचा आणि योजनांचा बोजवारा उडवायचा ..ही या नालायक अधिकारी वर्गाची नीती आहे.
नामदार भुजबळ यांनी केलेल्या आरोपासंदर्भात जनतेने स्वतः जागृत होऊन. भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर आंदोलन उभे करन्याची आवश्यकता आहे ...हे भ्रष्टाचारी अधिकारी जनतेचा पैसा लुटून , ऐश करतात..प्रचंड प्रॉपर्ट्यां खरेदी करतात.. हौस ,मौज मजा बिनधास्तपणे करत आहेत ..त्यांना करकचून आवळून ,वेसण घालून ,त्यांच्या मुसक्या आवळणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. हॉटेलिंगचा खर्च लाखात जातो. भ्रष्टाचाराचा पैसा असल्यामुळे हे अत्यंत महागडे ठरणारे हॉटेलिंग करणे या लोकांच्या संदर्भात फारसे नुकसानदायक नसते....
आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने हजारो कोटीचा निधी नाशिक महापालिकेला प्राप्त होणार आहे .त्यातील काही निधी हा प्राप्त ही झालेला आहे .या प्रचंड निधीचा प्रचंड स्वरूपात भ्रष्टाचार होणार , गैरवापर होणार , अनेक मनपा अधिकारी ,संबंधित राजकारणी या निधीवर दरोडा घालणार..पैशावर मनमुराद हात धुवून घेणार ..आपली आधीच गरगरीत पोट आणखी भरून घेणार... यात कुठलीही शंका नाही...या भ्रष्टाचारी डुकराना रोखण्याचा काही उपाय नाही का..?
असलाच पाहिजे.. जागृत जनतेने बांगड्या भरून बसू नये..आक्रमक व्हावे.... आम्ही 40 वर्षापासून सांगत आलो आहोत.. जनताच. मालक आहे.. जनताच सार्वभौम आहे..

Comments
Post a Comment