वटवृक्ष
नाशिकच्या पवित्र भूमी,तील एक लखलखते तेजस्वी रत्न म्हणजे आपले तात्यासाहेब... प्रथितयश साहित्यिक, ,श्री. वि, वा . शिरवाडकर, तथा मराठी भाषेचं एक अनमोल लेण.... कविश्रेष्ठ कुसुमाग्रज,..
तात्या साहेबांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि तात्यासाहेब नावाचे एक नवे दैदिप्यमान पर्व नाशिक नगरीच्या इतिहासात सुरू झाले .तो काळ महाराष्ट्रभरातील साहित्यिक, कवी, कलावंत, काही जुने जाणते रसिक नागरिक,राजकारणी आदि सर्वांसाठी स्वर्ण काळ होता. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रसिक मराठी जना चा एक सलग प्रवाह नाशिक मध्ये काही वर्ष अव्याहत सुरू होता. ते सोन्याचे दिवस इतिहास जमा झालेत.
काळाचे चक्र फिरत गेले आहे. तथापि स्मृती जागृत आहेत.
या स्मृती म्हणजे हृदयाच्या स्निग्धाळ कप्प्यांमध्ये चिरंतन स्वरूपात ठेवलेला अमूल्य दस्तावेज आहे. आज ,सहज जुनी पानं चाळता चाळता काही कात्रण हाती लागली, त्यातील एक सोन्याची झळाळी ल्यालेलं सुवर्णपान तुमच्या हाती देत आहे .
तात्यासाहेब शिरवाडकर यांचा माझ्यावर विशेष लोभ होता दैनिकाच्या रोजच्या धबडक्याच्या कामात कुठही जायला वेळ मिळायचा नाही .कुटुंबाला पुरेसा वेळ देता यायचा नाही.. कुठेही जाता येत नव्हतं .. मग केव्हातरी सुट्टीच्या दिवशी तात्या साहेबाकडे जाऊन बसणे होत असे ..
एकदा ,तात्या साहेबांचा वाढदिवस हिशोबात धरून एक दिवस आधी मी त्यांच्याकडे गेलो .आणि त्यांच्या वर वाढदिवसानिमित्त एक छोटा लेख लिहिला. अतिशय लघुलेख . "वटवृक्ष "....
त्याचीच प्रत इथे दिली आहे.
तात्यासाहेबांकडे गर्दीचा ओघ सुरू होता .मात्र नेहमीप्रमाणे तात्यासाहेबांनी मला पूर्ण वेळ दिला. विविध विषयावर यावेळेस तात्या साहेबांनी माझ्याशी मनमोकळी चर्चा केली. एखादा शांत धबधबा स्निग्ध स्वरूपात प्रवाहत रहावा..त्याप्रमाणे त्यांचं माझ्याशी मधुर स्वरात बोलणं सलग सुरू होतं .त्यातील मला जे आवश्यक वाटले, तेवढेच मुद्दे मी घेतलं .. आणि
वटवृक्ष या नावाने छोटा लेख लिहिला .नंतर काही दिवसांनी मी ,
तात्यासाहेबांकडे त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो, तेव्हा तात्यासाहेबांनी नेहमीप्रमाणे माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली ...आणि म्हणाले ,
"फार छान लिहितोस " ,फार छान .....
मला हा छोटासा लेख फार आवडला..
तात्यासाहेबांशी निगडित माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे..
पण ती सांगायची ही वेळ नाही..
मी देशदूत वृत्तपत्र स्वतःहून सोडून बाहेर पडल्यानंतर ..तीन-चार वर्षांच्या आसपास कदाचित तात्यासाहेबाकडे गेलो होतो.. तेव्हा त्यांनी मला पुन्हा जॉईन होण्याचा सल्ला दिला होता .मीही होकार दर्शवला होता .
पुन्हा नंतर तात्यासाहेबांची भेट झाली तेव्हा, त्यांनी व्यथित स्वरात
"नाही म्हणतात ",असे सांगितले.. स्वतः तात्यासाहेबांनी माझ्यासाठी टाकलेला शब्द त्या मुजोर मालकांनी ठोकरला होता....
1995 साली मी स्वतः होऊन देशदूत सोडल्यानंतर वर्षभराने तिथे जाऊन मी लहान मालकाशी वाद घालून अपशब्द वापरले होते.. ती खुन्नस मनात ठेऊन त्या हट्टी , दुराग्रही खुनशी ,मालकांनी देशदूत चे दरवाजे मला नेहमीसाठी बंद केले होते...
महान वटवृक्ष.... तात्यासाहेबांना त्रिवार अभिवादन.. ........

Comments
Post a Comment